गेल्यावर.....
- महेश मोरे (स्वच्छंदी)
काल...'जाते' म्हणून गेल्यावर
ती मला ठोकरून गेल्यावर
शर्थ केली समोर हसण्याची
फार रडलो निघून गेल्यावर
चेहरा दाखवू तुला कुठला ?
आसवांनी भिजून गेल्यावर
मिट्ट अंधार नाचतो भवती
एक कंदिल विझून गेल्यावर
बघ स्वत:हून सोडते जागा
पानसुद्धा पिकून गेल्यावर
काय बाकी उरेल सांगा ना
श्वास देहामधून गेल्यावर
- महेश मोरे (स्वच्छंदी)
काल...'जाते' म्हणून गेल्यावर
ती मला ठोकरून गेल्यावर
शर्थ केली समोर हसण्याची
फार रडलो निघून गेल्यावर
चेहरा दाखवू तुला कुठला ?
आसवांनी भिजून गेल्यावर
मिट्ट अंधार नाचतो भवती
एक कंदिल विझून गेल्यावर
बघ स्वत:हून सोडते जागा
पानसुद्धा पिकून गेल्यावर
काय बाकी उरेल सांगा ना
श्वास देहामधून गेल्यावर